आदिवासी विकास विभागाचे सचिव यांना  आदिवासी मुला- मुलींच्या समस्यांचे निवेदन दिले

आदिवासी विकास विभागाचे सचिव यांना  आदिवासी मुला- मुलींच्या समस्यांचे निवेदन दिले


   चोपडा प्रतिनिधी जिल्ह्यासह चोपडा तालुका सह इतर तालुक्यातील शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह प्रवेश व इतर समस्या संदर्भात बाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जळगाव शाखेतर्फ मुंबई येथे मंत्रालयात आदिवासी विकास विभागाचे सचिव मा.डॉ. राजेश सोंळकी यांना निवेदन देण्यात आले मागण्या पुढील प्रमाणे
शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह चोपडा यांच्या ईमारत बाधण्यासाठी शासकीय जागा त्वरित मिळावी,शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह जळगाव जिल्हासह तालुका स्तरावर उर्वरित सर्व पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनीनीची यादी त्वरित प्रसिद्ध करून त्वरित प्रवेश देण्यात यावे,पदव्युत्तर नंतर बीएड अभ्यासक्रमात दरवर्षी प्रमाणे वसतिगृहात प्रवेश देण्यात मात्र यावर्षी मात्र त्याचे प्रवेश अर्ज स्विकारत नाही तरी अर्ज स्विकारुन त्वरित प्रवेश देण्यात यावे,शैक्षणिक या वर्षाचा निर्वाह भत्ता, डी.बी.टी रक्कम त्वरित देण्यात यावी,सन-२०१८-१९ वर्षाची शैक्षणिक शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावे,
संयम योजना बंद करून वसतिगृहाची संख्या वाढविण्यात  यावी,यावल प्रकल्प कार्यालयात वसतिगृहाचा कामकाज पाहणाऱ्या कर्मचारी अनुभव कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यात यावी
खास बाब यादीत आलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीना वसतिगृहात प्रवेश व  एचसीईटी टॉली,टायपिंग प्रशिक्षण,वसतिगृहात पिण्यासाठी वॉटर कूलर,सौरऊर्जा संच बसविण्यात यावे,मुला-मुलीच्या वसतिगृहाताची इमारती दुरुस्ती व वाचनालय सुरू करण्यात यावे वसतिगृहात इतर जिल्हाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीना प्रवेशित असतात अशा एमएचसीईटी,टाईपिंग प्रशिक्षण कोर्सेस सुरू करण्यात यावे या मागण्यांचे निवेदन जळगाव जिल्हा अध्यक्ष दारासिंग पावरा प्रा.जेकराम बारेला  प्रा.संजय भादले आदि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More