चोपडा येथील जि.प.उर्दू मुलांची शाळा क्र.२ आणि ४ एकत्रीकरण न करणे बाबत शेख नईमोद्दिन ऐनोद्दीन यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
चोपडा येथील जि.प.उर्दू मुलांची शाळा क्र.२ आणि ४ एकत्रीकरण न करणे बाबत सामाजिक कार्यकर्ता शेख नईमोद्दिन ऐनोद्दीन यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले .

2जिल्हा परिषद कार्यालयाकडून ज्या मुले व मुलींच्या प्राथमिक शाळा एकाच आवारात स्वतंत्र सुरू आहेत अशा मुले व मुलींच्या शाळांचे एकत्रीकरण संदर्भित पत्रान्वये आपण आदेशित केले आहे. परंतु चोपडा शहरातील जि. प. मुलांची शाळा क्र. २ आणि ४ ह्या दोन्हीही शाळा मुलांच्या शाळा आहेत.
संदर्भिय निर्णय आपण शासन निर्णयावर विसंबून घेतला आहे. परंतु सदर शासन निर्णय केवळ मुले आणि मुलांच्या शाळा ह्या दोन प्रकाराच्या शाळा एकत्रीकरणा साठीचा निर्णय असून दोन मुलांच्या शाळा एकत्रीकरण करण्याचा त्यात उल्लेखच नाही तरी देखील संदर्भित पत्रात जि.प.मुलांची शाळा क्र. २ आणि ४ एकत्रीकरण करण्याचा निर्णय आपण कृपया रद्द करावा दोन्ही शाळा एकत्र केल्यास लहान मुलांना शालेय शिक्षणात अडचण येऊ नये यासाठी कृपया सदर निर्णय रद्द करावा ह्या आशयाचे निवेदन जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे 












