चोपडा तालुक्यात महावितरण तर्फे कुठलीही लेखी नोटीस न देता हुकूमशाही पध्दतीने विज कनेक्शन तोडणी थांबविणे बाबत सामाजिक कार्यकर्ता नईमोद्दीन ऐनोद्दीन शेख महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले 
चोपडा तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात महावितरण भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम ५६ नुसार विज वितरण कंपनीला थकबाकी साठी विज पुरवठा खंडीत करण्यापूर्वी ग्राहकाला १५ दिवसाची लेखी सूचना देणे बंधनकारक आहे परंतु वर नमुद भागातील कर्मचारी ग्राहकांना दमदाटी व कायदयाचे उल्लंघन करुन विज कनेक्शन खंडीत करत आहे.
महावितरण अत्यावशक सेवेत येत असून आपण कायदयाचे तंतोतंत पालन न केल्याने ग्राहकांच्या घरा मध्ये कोणाच्या घरात सर्प, विंचू अशी विषारी प्राणी घुसुन जिवीत हानी होवू शकते तसेच अनेक घरात आजारी पेंशट, डिलेव्हरी झालेल्या महिला, वृध्द लोक, अस्थमा पेशंट आहेत, तरी अशा नागरिकांचे कोणाचीही जिवाची पर्वा न करता हुकूमशाही पध्दतीने आपले कर्मचारी कायदयाचे पालन न करता ग्राहकांचे विद्युत कनेक्शन अचानकपणे येवून खंडीत करीत आहेत. काही ग्राहकांकडून मुदत वाढीसाठी चिरी मिरी घेऊन मुदत वाढ देण्यात येत असते जे ग्राहक महावितरण कर्मचाऱ्यांना चिरी मिरी देत नाही त्यांचे कनेक्शन कट करून मीटर जमा करण्याच्या धमक्या ग्राहकांना दिल्या जात आहे गव सर्व ग्राहकांचे पुर्न-विद्युत कनेक्शन जोडणीकामी आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.तरी तात्काळ दखल घेवून, बेकायदेशीर व हुकूमशाही प्रमाणे कारभार करणारे विद्युत कर्मचारी यांना कडक समज दयावी व ग्राहकांवर होणारा अन्याय थांबवावा अन्यथा तुम्हा सर्वां विरुध्द कोर्टात धाव घ्यावी लागेल याची आपण नोंद घ्यावी ह्या आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते नईमोद्दीन ऐनोद्दीन शेख यांनी चोपडा उप विभागीय अभियंता यांना दिले 












