चोपडा तालुक्यातील अडावद ग्रामपंचायत अंतर्गत रफिक शेख तय्यब मनियार हा शिपाई म्हणून कार्यरत असून त्याच्या नावाने रक्कम रुपये ४५००० हजार रुपयाचे बिल मा. ग्रामविकास अधिकारी/ सरपंच यांनी अदा केलेले आहे.
तरी ग्रा.पं कर्मचार्यांना ठेका देता येतो का हा संपूर्ण भोंगळ कारभार असून मा. सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगणमत करून ४५००० हजार रुपयाचा भष्टाचार केलेला आहे. कारण या मध्ये मा. सरपंच म. ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांनी शासनाच्या पैसाची उधळ पट्ठी केलेली आहे. ते या वरून सिद्ध होत आहे.
दिनांक २६/११/२०२५ रोजी यावर तक्रारी अर्ज दिला असून माहिती मांगितली असता . मा. ग्रामसेवक यांनी यावर कोणतेही उत्तर दिले नाही. उलट मला सांगितले कि तुला जिथे जायचे असेल जा मी बगून घेईल. जुनेद खान मुन्सफ ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्याला विनंती करतो कि आपल्या स्थरावरून खुलासे वार माहिती मिळावी या बाबत संबंधित ग्रामपंचायत कर्मचारी सक्षम असल्याने ग्रामपंचायतीचे ठेके घेतो त्याच्या नावाने मा. ग्रामविकास अधिकारी/ सरपंच हे बिले अदा करतात.
त्यांना शिपाई पदावरून तात्काळ कमी करण्यात यावे. असे नाही केल्यास.मी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसेल. कारण वरील पैशांच्या शुद्ध भष्टाचार झालेला आहे. संबंधितांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी आशयाचे निवेदन चोपडा गटविकास अधिकारी यांना दि.२३ रोजी देण्यात आले आहे. ह्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही












