29 डिसेंबर रोजी व्यवस्था आहे पण शिक्षण नाही या विषयावर चोपड्यात व्याख्यान

चोपडा (प्रतिनिधी )

चोपडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित,विवेकानंद विद्यालय चोपडा येथे प्रतिवर्षाप्रमाणे विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित,विवेकानंद विद्यालय चोपड या ठिकाणी दिनांक 29 डिसेंबर 2025 दुपारी 4: 30 वाजता “व्यवस्था आहे पण शिक्षण नाही” या विषयावर कोल्हापूर येथील डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे.

तरी सर्व रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर व संपूर्ण संचालक मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More