चोपडा लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता पाटील यांचा१जानेवारी रोजी पदग्रहण.

चोपडा:-चोपडा शहराच्या शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील या एक जानेवारी रोजी नगराध्यक्षा पद स्वीकारणार आहेत.पहिल्यांदाच चोपडा नगरपालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान होणार असून नम्रता सचिन पाटील या उच्च शिक्षित व आतापर्यंतच्या सर्वात तरुण अश्या नगराध्यक्षा असणार आहेत.

या पद्ग्रहण सोहळ्याची सुरुवात एक जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेला मुजुमदार गणपती मंदिरा पासून होणार असून वाजत गाजत सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह होणार असून या कार्यक्रमाला खास उपस्थिती आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड संदीप भैया पाटील,डॉ. स्मिता पाटील,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पद्ग्रहण सोहळा पार पडणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील,माजी सभापती सुरेश बापु पाटील, संचालक सांगोरे सर,ऍड शिवराज पाटील,माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील,रवींद्र बळीराम पाटील(उद्योजक)सचिन पाटील, माजी नगरसेवक महेंद्र धनगर,नंदू गवळी,धीरज गुजराथी,प्रदीप बारी,दीपक चौधरी यांच्यासह नवनियुक्त नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More