चोपड्यात डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणा-या दिलीप नेवे विरूद्ध गुन्हा दाखल

चोपडा – येथे भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सोशल मिडियावर अपमानास्पद व बदनामीकारक मजकूर व्हायरल करणा-या दिलीप लक्ष्मण नेवे विरूद्ध नागरिकांच्या रेट्यानंतर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पोस्टमुळे बौध्द समाज बांधवांच्या भावनांचा उद्रेक झाला असून संबधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,दिलिप लक्ष्मण नेवे यानी दि.२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता सोशल मिडियाच्या फेसबुक या प्लॅटफार्मवर पुष्पराज त्रिपाठी याची पोस्ट शेअर करुन डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत बदनामीकारक ,अपमानास्पद व तथ्यहिन पोस्ट प्रसारित केली.त्यामुळे अनुसूचीत जाती,नवबौध्द व डॅा.आंबेडकरांच्या भावना दुखावल्या गेल्या.तसेच असंतोषाचा डोंब उसळला.

या असंतोषाचा उद्रेक झाल्याने शेकडो महिला व पुरुषांनी चोपडा शहर पोलिस स्टेशनला धाव घेवून दिलीप नेवेला अटक करण्याची व गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.तसे निवेदन पो.नि.मधुकर साळवे यांना सादर केले.

आंदोलकांच्या तिव्र भावना लक्षात घेवून चोपडा शहर पोलीस ठाण्यात ग.र.नं.१/२०२६ बी.एन.एस.कलम १९६(१)(अ),३५३(२),३५६(२),३५६(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पी.एस.आय.चेतन परदेशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More