विवेकानंद विद्यालय चोपड्यातील राकेश विसपुते राज्यावर टॉप टेन बक्षीसासाठी निवड

चोपडा (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संचलित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट जालना आयोजित राज्यस्तरीय शालेय विविध क्लब सादरीकरण स्पर्धेत जालना येथे संपन्न झालेल्या राज्यस्तर स्पर्धेत 38 स्पर्धकांमधून पारितोषिकासाठी टॉप -10 क्रमांक राकेश राजकुमार विसपुते तंत्रस्नेही कलाशिक्षक विवेकानंद विद्यालय चोपडा, निमगव्हाण केंद्र, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव ,विभाग नाशिक यांनी पटकावला. विवेकानंद विद्यालयात सुरू असलेल्या विविध क्लब पैकी एक क्लब मशीन व रोबोटिक्स क्लबचे जून पासून तर आतापर्यंतचे केलेल्या कार्याचे सादरीकरण राज्यस्तरावर अतिशय सुंदर पद्धतीने मांडले व टॉप -10 क्रमांक पटकावित राज्यस्तरावर यशस्वी झालेत.

त्यांनी जालना येथे राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक विभाग, जळगाव जिल्हा, चोपडा तालुका, निमगाव केंद्र ,विवेकानंद विद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. या यशासाठी जालना, नाशिक, नंदुरबार,जळगाव डाएट विभागातील सर्व अधिकारी, अधिव्याख्याते, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी ,पालकवर्ग व विद्यार्थीवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले. लवकरच भव्य दिव्य समारंभात त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More