चोपडा तालुक्यातील पिडीत शेतकरी आपणांस व आपल्या माध्यमातुन महाराष्ट्र शासनाने शासकीय हमी भावा नुसार मका खरेदी करण्यासाठी दोन-अडीच महिन्यापुर्वी शेतकऱ्यांची ऑन लाईन नोंदणी चोपडा शेतकी संघा मार्फत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा मका हा बाजारात किंवा कोठेही विकलेला नाही. तसेच आम्हा सामान्य शेतकऱ्यांच्या घरात मका साठवणुकीसाठी जागा नसल्याने सदर मकाची कणसे ही शेतात उघडयावर साठवुन ठेवलेली आहेत तरी निर्सगाच्या अवकाळी पावसामुळे सदर मक्याचे देखभाल करणे शेतकऱ्यांना जिकरीचे झालेले आहे.
जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात शासकीय मका खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत मात्र एकमेव चोपडा तालुक्यातील शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात काढुन ठेवलेला मका निर्सगाच्या अवकाळी पाऊस व वादळामुळे मातीमोल होण्याची दाट शक्यता आहे आणि यासाठी सर्वस्वी चोपडा प्रशासन व महाराष्ट्र शासन हेच जबाबदार राहणार आहेत. तरी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आपण शासकीय प्रतिनीधी या नात्याने व जनतेचे सेवक या नात्याने आपण मका खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी आम्ही पिडीत शेतकरी या निवेदन चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले .
यावेळी प्रीतमसिंग हुकुमसिंग पाटील, दीपक भागवत पाटील, योगेश सुरेश पाटील, वर्धमान भुरेसिंग पाटील, मोहन उत्तम पाटील, कोमलसिंग कांतिलाल पाटील,राजेंद्र शंकरलाल गुजराथी उपस्थित होते












