ध्वनी प्रदूषणा बाबत समाजात जागृती व्हावी : पर्यावरण प्रेमी समूहाचे निवेदन

चोपडा : येथील पर्यावरण अभ्यासक व पर्यावरण संरक्षणाबाबत जागृत असलेल्या पर्यावरण प्रेमी समूहाच्या माध्यमातून शहरात वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना निवेदन देण्यात आले. इयत्ता बारावी वर्गाची परीक्षा पुढील आठवड्यात सुरू होत असून त्यानंतर लगेच दहावी वर्गाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. लग्नसराईमुळे व इतर विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासकाळात रात्री 10 नंतर वाजणारे डीजे भुंगे यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो तसेच परिसरातील वृद्ध, बालक व रुग्णांना या ध्वनी प्रदूषणामुळे त्रास सहन करावा लागतो. ध्वनी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने समाजात जाणीव जागृती करून कायद्याचे स्वरूप जनतेस लक्षात आणून द्यावे व ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी याबाबतचे निवेदन शहरातील पर्यावरण प्रेमी समूहामार्फत पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी देखील ध्वनी प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे आश्वासन दिले. निवेदनावर प्रा. शैलेश वाघ, प्रा. आर. एम. बागुल, डॉ. मुकेश पाटील, मोतीराम पावरा, जितेंद्र पाटील, प्रदीप सौदागर, संगीता पाटील, ए. एम. बाविस्कर, प्रणाली तायडे, रुपेश पाटील व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More