चोपडा (प्रतिनिधी) चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील शेतकऱ्यांचा शेतातून वायरी चोरी करणाऱ्या भामट्याला पकडण्यात चोपडा पोलिसांना यश मिळाले.दि-२२ रोजी सांय.०५:३० ते ०७ वाजेचा सुमारास चोपडा शहर पो.स्टे.च्या हृददीतील काबरा पेट्रोलपंपच्या मागे असलेल्या नरेंद्र रतीलाल धनगर यांच्या शेतातुन सुमारे १२०० फुट रिलायवल गोल्ड कंपनीची बोरींग मोटरची केवल वावर शेतातुन चोरांनी चोरुन नेली होती. म्हणुन चोपडा शहर पोलिस ठाण्यात भा.न्या. संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
त्यावरुन चोपडा शहर पो.स्टे. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार चोपडा शहर पोलिसांनी रामपुरा भागात असलेल्या स्मशानभुमीच्या पाठीमागे असलेल्या भंगार दुकानदार अनिल बाबुराव रायसिंग रा. शेतपुरा चोपडा यास गुन्हयात चोरी केलेली केबल वायर जाळुन त्यात असलेल्या ताब्यात तार व चोपडा शहर पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे मधील चोरी केलेली मोटर सायकल हीच्यावर चोरीचे तांब्याची तार सुमारे ११ किलो अशी एकुण मुद्देमाल ४०,०००/-रुपये कि.चा मुद्देमाल विक्री करण्यासाठी आरोपी-नामे-अनिल जामसिंग बारेला रा. कारगील चोपडा हा विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्यास चोपडा शहर पो.स्टे. पथक रवाना होवुन गुन्हयातील चोरी केलेली वायर व मोटर सायकल आरोपी अनिल जामसिंग बारेला व अनिल बाबुराव रायसिंग अशांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगीरी डॉ महेश्वर रेडी पोलीस अधिक्षक जळगाव, कविता नेरकर मॅडम अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, याचे मार्गदर्शनाखाली व अण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा, उपविभाग याचे सुचना प्रमाणे पोलीस निरिक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरिक्षक एकनाथ भिसे, पो-उप-निरीक्षक चेतन परदेशी, सफौ दिपक विसावे पोहेकॉ संतोष पारधी, पोहेकॉ ज्ञानेश्वर जवागे, संदिप भोई, पोकों विनोद पाटील, निलेश वाघ,जगन्नाथ पाटील अशांनी केली आहे.












