चोपडा विरवाडा रस्त्यावर अर्टिका गाडीचा भीषण अपघात: दोन ठार, तीन जखमी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात विरवाडे गावावर शोककळा पसरली

चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून चोपड्याच्या दिशेने येत असताना आज सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास अर्टिका (एम.एच१९बीएस १००८) या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघातात राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत या दोन व्यक्ती जागीच ठार झाले.आणि तीन जण जखमी झाले आहेत बंटी रविंद्र कोळी राकेश भगवान राजपूत (गिरासे) दोन जणांना मोरेश्वर हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत तर विजय अमृत भोई यांना गंभीर जखमी असल्या मुळे त्यांना जळगाव हलवण्यात आलेले आहे.

घटनास्थळी उपस्थितानी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे नेमके झाले असल्याचे बोलले जात आहे पोलिस निरीक्षक मधुकर सावळे घटना स्थळी भेट भेट दिली असून पुढील, तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More