सावकाराच्या जाचाला कंटाळून चोपड्यात युवकाची आत्महत्या.# घटना स्थळी युवकाने लिहलेली चिठ्ठी खिश्यात आढळून आली …

चोपडा शहरातील लोहिया नगरमधील रहिवासी असलेल्या योगेश सुनील चौधरी (वय २५) या युवकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. मयत योगेशच्या खिश्यात चिठ्ठी सापडली असून पिंटू नामक व्यक्ती पैशांसाठी सतत तगादा लावत असल्याने मी आत्महत्या करत असल्याचा त्यात उल्लेख केला आहे.

मयत योगेश चौधरी हा हातमजुरी करत होता. अत्यंत हलाखीची परिस्थितीत तो आपला उदार निर्वाह करत होता. दरम्यान, मयत योगेश चौधरी याने पिंटू नावाच्या व्यक्तीकडून १० हजार रुपये घेतले होते. त्या पोटी त्याने दोन लाख रुपये व्याज पिंटूला दिले. तरी ही तो पैश्यांसाठी पुन्हा पुन्हा तगादा लावत होता. त्यात त्याने मयत योगेशला धमकी देऊन मारहाण केली होती. तसेच त्याच्या आई, वडिलांना ही शिवीगाळ केली होती. या सर्व गोष्टींना कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख योगेशने चिठ्ठीमध्ये केला आहे. पिंटू या व्यक्तीला पोलिसांनी कडक शिक्षा करावी, अशी विनंतीही त्याने चिठ्ठीत केली आहे. योगेशचे कुटुंब अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपला उदरनिर्वाह करत होते. मयत योगेश चौधरी याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार असून ते देखील मोलमजुरी करत असल्याचे परिसरातील मित्र मंडळी व नातेवाईकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More