चोपडा राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ऊनपदेव शिवारात ७.८१ लाखांचा मद्यसाठा जप्त

महाराष्ट्र 9न्यूज नेटवर्क मुख्य संपादक सचिन जैस्वाल

 

चोपडा: होळी आणि भोंगरीया सणांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्रीवर मोठी कारवाई केली आहे. चोपडा तालुक्यातील ऊनपदेव शिवारात सापळा रचून विभागाने तब्बल ७ लाख ८१ हजार ०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना आणि कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान भूषण सुभाष परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ऊनपदेव-वर्डी रस्त्यावर मध्य प्रदेश निर्मित अवैध मद्याची विक्री होणार होती. त्यानुसार २ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सापळा रचण्यात आला. तेथे महेंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एम पी -४६-झेड.डी-८४५४) मधून मद्य विक्री सुरू असताना पथकाने झडती घेतली.

जप्त केलेला मुद्देमाल (तपशील)

माउंट ६००० स्ट्रॉन्ग बिअर: ३६६ बाटल्याची किंमत ₹४२,०९०.

बनावट देशी दारू (टँगो पंच): ५३५ बाटल्याची किंमत ₹३२,३२०,रॉयल स्टॅग २४ बाटल्याची किंमत ₹६,०००. वाहन व इतर: ७ लाख रुपयांची बोलेरो पिकअप आणि दोन प्लास्टिक टब.भरारी पथक आणि सहभागी अधिकारी यांनी कारवाई केली. अधीक्षक डॉ. विठ्ठल टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये जळगाव भरारी पथकातील खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अशोक पी.तारू (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जळगाव) योगेश सूर्यावंशी (दुय्यम निरीक्षक, भरारी पथक, जळगाव)नरेंद्र पाटील, राहुल सोनवणे ,पुनम पाटील.

तसेच चोपडा विभागाचे निरीक्षक अब्दुल कैय्युम सु. मोमीन, दुय्यम निरीक्षक निकिता खपके, जवान विपुल बलदेव राजपूत, भूषण परदेशी, कुणाल सोनावणे, नितिन पाटील आणि दिनेश पाटील यांचाही या पथकात समावेश होता.या प्रकरणी अत्तरसिंग मांगिलाल बारेला (वय २७) आणि विकास बिरसिंग बारेला (वय २९), दोन्ही रा. मुळया उतार, ता. चोपडा यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक ए. के. सु. मोमीन करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More