पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न…

महाराष्ट्र 9न्यूज नेटवर्क मुख्य संपादक सचिन जैस्वाल

चोपडा: पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दोन दिवसांचा पार पडला. या समारंभाला पंकज शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, अध्यक्ष पंकज बोरोले, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अविनाश राणे, संचालक गोकुळ भोळे, हेमलताताई बोरोले, दिपालीताई बोरोले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.समारंभाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून आर ए पोद्दार मेडिकल कॉलेज मुंबई येथे कार्यरत असलेले व 24 फेब्रुवारी 2026 रोजी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले मेडिकल ऑफिसर डॉक्टर कपिल पाटील, डॉक्टर नीलिमा चौधरी- असोसिएट प्रोफेसर पंचकर्म विभाग आरबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल-आग्रा येथे कार्यरत असलेल्या, तसेच रिटायर्ड आर्मी ऑफिसर माननीय संतोष माळी, माननीय भरत राठोड, चोपड्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका सागर मिसर, चोपडा तालुक्याचे पीएसआय सचिन चौधरी, नगरसेवक प्रवीण सदाशिव देशमुख, एम एस ई बी चे अभियंता संदीप महाजन, चोपडा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष एडवोकेट रुपेश पाटील भौतिक शास्त्र विषयाचे तज्ञ प्रकाश देशमुख, गोपाल बारेला, शुभांगी ताई पाटील, दीपेश बडगुजर, कविता ताई कोळी, शाळेचे प्राचार्य मिलिंद पाटील इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

या समारंभात शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि खेळातील कामगिरीबद्दल पारितोषिके प्रदान करण्यात आली. क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वीरित्या कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्वर, ब्रांझ पदक देऊन गौरविण्यात आले.

दोन्ही दिवशी शाळेत शिवप्रेमी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पीएचडी करीत असणारे संकेत गांगुर्डे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनाला पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शाळेचे याबाबतीत खूप कौतुक केले की पाठ्यपुस्तकातून आता शिवाजी महाराजांचा इतिहास कमी होऊ लागलेला आहे पण या माध्यमातून शिवाजी महाराज प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत जात आहेत. संकेत गांगुर्डे यांनी सुद्धा पालकांना आणि विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगून ऊर्जा दिली.

डॉ.कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपल्या भाषणातून उत्तम मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की विद्यार्थी जीवनात प्रत्येकाने संघर्षाला घाबरायचे नाही, अपयश पचवता आले पाहिजे आणि त्या अपयशाला स्वीकारून यश कसे संपादन करावे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बोरोले यांनी सुद्धा आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन शुभांगी पाटील आणि स्वाती शिंदे ,इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी दिव्या महाजन, तनिष्का महाजन, देवयानी चोले, दिशा पाटील, दर्शली पाटील, स्वराली चौधरी यांनी यांनी सुद्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रम यशस्वीरित्य पार पाडण्यासाठी शाळेच्या समन्वयक उपमा जयस्वाल, शारदा अहिरे, स्वाती सोनवणे, प्रीती पाटील या शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More