चोपडा (प्रतिनिधी) 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जि.प. केंद्र शाळा, नागलवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागलवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख.देवेंद्र भास्करराव पाटील यांना देण्यात आले. गावाचे उपसरपंच श्री. सचिन पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .मेघनाथ पाटील, वैशाली पवार ,ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पाटील , अंगणवाडी ताई आणि मोठ्या प्रमाणावर महिला पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन, ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. प्रास्तावित मुख्याध्यापिका.चित्राताई भैय्यासाहेब पाटील यांनी मांडले. सदर प्रसंगी आदर्श अंगणवाडी सेविका लताताई रवींद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात यशस्वी महिलांची वेशभूषा करून आपले मनोगत सादर केले.इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. शिवजयंती निमित्त समूह नृत्यात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून आकर्षक पॅडचे वाटप करून कौतुक करण्यात आले. महिला पालकांसाठी हळदीकुंकू तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून बक्षीस वाटप करण्यात. आले. सदरप्रसंगी सर्व महिला पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.दिगंबर पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र शिरसाट ,राहुल दाभाडे, सुजाता बोरसे, सोनाली साळुंखे, कल्पना पाटील ,वंदना बाविस्कर, स्वाती बाविस्कर या सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली. वंदे मातरम आणि आभाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












