चोपडा दिनांक 20 रोजी साडे चार वाजेचा चा सुमारास वैजापुर ते चोपडा जाणारे रोडवर बोर अजंटी शिवारात बापु नरसिंग बारेला रा. बोरअजंटी यांचे शेताजवळ इम्रान रहेमान पठाण वय 21 वर्ष, रा. सातोना खुर्द, ता. परतुर, जिल्हा जालना, रहेमान निहामत पठाण वय 59 वर्ष, रा. सातोना खुर्द, ता. परतुर, जिल्हा जालना,अतिक रफिक शेख वय 45 वर्ष रा. सातोना खुर्द, ता. परतूर, जिल्हा जालना, हे वरील 13 किलो 254 ग्रॅम वजनाचा 2,91,588/- रुपये किंमतीचा गांजा अंमलीपदार्थ, 15,000/- रु कि.चे 03 मोबाईल, 1500/-रु रोख रक्कम असा एकूण 3,08,088/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांचे ताब्यात मिळुन आल्याने गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणामकरणारे अधिनियम 1985 चे कलम 20(ब), 22 प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक करत आहे 













