मामलदे येथे दोन महिन्याच्या बालिकेची हिंस्त्र प्राण्याने केली शिकार वन विभागावर नागरिकांची नाराजी

चोपडा तालुक्यातील मामलदे येथे दोन महिन्याच्या बालिकेची हिंस्त्र प्राण्याने शिकार, वन विभागावर नागरिकांची नाराजी

 

चोपडा तालुक्यातील मामलदे गावाच्या जंगलात दोन महिन्याची बालिका आईच्या कुशीतून उचलून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागावर नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, मामलदे गावातील शेतात राजस्थानी काठेवाडी गाईंसह वास्तव्य करत असलेल्या कुटुंबातील दोन महिन्याची बालिका रात्री खाटेवरती आईच्या कुशीत झोपलेली होती. सकाळी आईजवळ न दिसल्याने संपूर्ण काठेवाडी कुटुंब शेताच्या आजूबाजूला शोध घेऊ लागले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर वास्तव्याला असलेल्या शेतापासून काही मीटर अंतरावर गव्हाची कुट्टी जवळ मांस व तुकडे मिळून आले.

सदर घटना शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कळल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह इतर अधिकारी तसेच फॉरेन्सिक टीम यांनी भेट देऊन माहिती घेतली. प्राथमिक दृष्ट्या हिंस्र प्राणी यांने उचलून नेले असल्याचा दिसून येत आहे.

चोपडा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. चोपडा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत बरेच जनावरे जखमी व मृत झाले आहे. मनुष्यहानीची घटना चोपडा तालुक्यात झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होताना दिसून येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More