चोपडा येथे तंत्रनिकेतनातील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ५१ विद्यार्थ्यांची निवड

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित,श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा महाविद्यालयात आयोजित कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमात विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले असून एकूण ५१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये विद्युत विभागाचे ३३, यांत्रिकी विभागाचे १० व आय.टी.आय. चे ०८ विद्यार्थी निवडले गेले. ही भरती प्रक्रिया Schaeffler India Pvt Ltd (शेफ्लर इंडिया लिमिटेड) आणि Randstad India (रँडस्टॅड इंडिया) यांच्या माध्यमातून पार पडली.

या प्रसंगी शेफ्लर इंडिया लिमिटेडचे प्रॉडक्शन हेड वसंत डोएबोले, तसेच एच.आर. मॅनेजर  शहाजी माने यांनी विद्यार्थ्यांना कंपनीविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच Randstad India तर्फे विलास आव्हाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी सागर दाऊने (इन-प्लांट एच आर) हेही उपस्थित होते.

कार्यक्रमात प्राचार्य व्ही.एन.बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळविण्यावर न थांबता, आपल्या कौशल्यांचा सातत्याने विकास करावा. उद्योग क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.” या कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख तसेच आय.टी.आय. चे प्राचार्य उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अँड संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,धनराज आर. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. के.चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर भूषण जे. पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More