विवेकानंद विद्यालयाची स्वरा हरताळकर राज्यात प्रथम

चोपडा ( प्रतिनिधी ) येथील विवेकानंद विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. स्वरा विनीत हरताळकर हि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे आयोजित इंग्लिश ग्रामर ऍडव्हान्स फेब्रुवारी 2026 या राज्यस्तरीय स्पर्धेत 100 पैकी 78 गुण मिळवत राज्यात सर्वप्रथम आली तिला विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे शिक्षक व या स्पर्धेचे कामकाज बघणारे उपशिक्षक प्रसाद वैद्य सर व तिच्या पालकांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळाले.

स्वरा व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर ,उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, संस्थेचे विश्वस्त डॉ. नीता हरताळकर ,डॉ.अमित हरताळकर ,ज्योत्स्ना हरताळकर, नरेंद्र भावे ,उपमुख्याध्यापक पवन लाठी, मुख्याध्यापिका आशा चित्ते ,रेवती दीक्षित, योगिता केंगे , संजय सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद ,कर्मचारीवृंद ,पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More