चोपडा येथील प्रदीप माळीचा खुनाच्या गुन्हयांतील आरोपी अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेचा पथका ने केले जेरबंद # सिने स्टाईल चालत्या रेल्वेत शोध घेत आरोपीना घेतले ताब्यात

दिनांक १९/०४/२०२६ रोजी रात्री ०९/०० ते दिनांक २०/०४/२०२६ रोजी सकाळी ०८/३० वाजेचे दरम्यान चोपडा शहरात चोपडा ते धरणगाव रोडवर पाटचारी जवळ यातील संशयीत आरोपी नामे चेतन सुभाष कानडे याचे सांगणे वरुन विजय भास्कर वैदकर, रा. भाग्योदय नगर, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव, निर्मल संजय बडगुजर, रा. चिंच चौक, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव यांनी संगणमताने यातील फिर्यादी यांचा मुलगा नामे प्रदिप राजेंद्र महाजन वय ३३ वर्षे रा. तारामती नगर चोपडा ता. चोपडा जि. जळगाव याचा पूर्व वैमनस्यच्या कारणावरुन अज्ञात हत्याराने चेहरा व डोके ठेचुन, मारुन त्याचा खुन केला होता. त्यावरुन चोपडा शहर पो.स्टे ला भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 3(5) प्रमाणे दि.20/04/2026 रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्हयांतील आरोपी ।) विजय भास्कर बेदकर, रा. भाग्योदय नगर, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव, 2) निर्मल संजय बडगुजर, रा. चिंच चौक, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव हे आरोपी गुन्हा केल्यानंतर लागलीच पळून गेले होते. सदर आरोपीतांचा गोपनिय माहितीच्या आधारे कोठे गेले बाबत तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनिय बातमीदारा मार्फत तपास केला असता सदर आरोपी हे मुंबई येथे गेले असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पोलीस पथक सोपान गोरे, जितेंद्र वल्टे, रविंद्र पाटील, दिपक माळी, वीलेश सोनवणे, विष्णु बिन्हाडे, रावसाहेब पाटील, रिजवान शेख असे पथक मुंबई कडे तात्काळ रवाना झाले होते. त्यानंतर सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर आरोपी हे रेल्वेने दादर मुंबई येथून जळगाव कडेस निघाले आहेत. परंतु ते कोणत्या रेल्वेत बसले याबाबत खात्रीशिर माहिती नसतांना जळगाव कडेस येणाऱ्या रेल्वे मध्ये सदर आरोपीतांचा नमुद पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नाशिक येथून रेल्वे बसुन सदर आरोपीतांचा चालत्या रेल्वे मध्ये शोध घेत असता त्यांना नाशिक ते चाळीसगाव दरम्यान चालत्या रेल्वे मध्ये ताब्यातघेतले.

सदर आरोपीतांना सदर गुन्हयांबाबत विचारपुस करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथे आणले असता त्यांना नमुद गुन्हयांबाबत विचारपुस करता ते प्रथम गुन्हयांची कबुली देत नव्हते. त्यामुळे त्यांना पुन्हा विश्वास घेवून विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, मयत याने आरोपी विजय भास्कर वैदकर यास पूर्व वैमनस्यातुन केल्याचे कबुल केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More