चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपड्याचे माजी नगरसेवक नारायण बोरोले यांच्या पत्नीचे उत्तराखंडमध्ये दुर्दैवी निधनः बोरोले कुटुंबावर मोठा आघात

चोपडा शहरातील पंकज नगर परिसरात राहणाऱ्या प्रतिभा बोरोले (वय 59) या धार्मिक भावनेतून चारधाम यात्रेला गेल्या होत्या. त्यांच्या सोबत चोपड्यातील एकूण 16 भाविकांचा गट होता. यात्रेदरम्यान प्रतिभा नारायण बोरोलेची तब्येत अचानक खालावली. रात्रीच्या वेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यामुळे सोबत असलेल्या सहप्रवाशांनी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न केले.

प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना केदारनाथच्या खाली असलेल्या चमोली परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र त्यांची तब्येत सुधारली नाही. अखेर 1 मे रोजी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे चोपडा शहरात शोककळा पसरली आहे. धार्मिक यात्रेदरम्यान असा प्रसंग घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिभा बोरोले या माजी नगरसेवक नारायण बोरोले यांच्या पत्नी होत्या. तसेच पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांच्या त्या भावजाई होत्या. उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांच्या त्या काकू असल्याने बोरोले कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More