पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यातच ‘हर घर नल, हर घर जल’ योजनेचा फज्जा..# योजनेचे 60 लाख खर्चून सुद्धा आदिवासी बांधव तहानलेलेच..

महाराष्ट्र9 न्युज नेटवर्क प्रतिनिधी भारताला स्वातंत्र्य मिळूनही अध्यापही यावल तालुक्यातील चारमळी या गावाला अनेक सुविधा सुविधा उपलब्ध नाही. गावकऱ्यांना एक थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. जळगाव जिल्ह्यात ‘हर घर नल, हर घर जल’ योजनेचा फज्जा उडालाय. आदिवासी पाड्यावर पाण्यासाठी वणवण चार मंत्र्यांच्या जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल जल जीवन मिशन योजना फक्त कागदावरच दिसतेय.

 

केंद्र आणि राज्य सरकारकडून ‘हर घर नल, हर घर जल’ या महत्त्वाकांक्षी योजनेची मोठ्या प्रमाणात घोषणा केली जात असताना जळगाव जिल्ह्यात मात्र या योजनेचे वास्तव वेगळेच चित्र दाखवत आहे. जिल्ह्यात चार मंत्री, दोन खासदार असतानाही अनेक दुर्गम भागांतील नागरिकांना अजूनही पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मतदारसंघातील यावल तालुक्यातील चारमळी येथील आदिवासी पाड्यावर पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. महिला आणि ग्रामस्थांना दररोज दऱ्या-खोऱ्यांतून जीव मुठीत धरून पाण्याचा एक थेंब मिळवण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. भर उन्हाळ्यात तब्बल ४५ अंश सेल्सिअस तापमानात पाण्यासाठी होणारी ही धावपळ अत्यंत भयावह आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याचेच महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यातच ‘हर घर नल’ योजनेचा पर्दाफाश होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या योजनेसाठी सुमारे 60 लाख रुपयांचा निधी खर्च झाल्याची नोंद असून गावात फलक लावून भूमिपूजनही करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात गावकऱ्यांच्या घरी नळाद्वारे पाणी पोहोचलेले नाही. आदिवासी बांधव निसर्गाशी सुसंगत जीवन जगत आपली संस्कृती जपून आहेत. मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि योजनांची मोठी जाहिरात होत असतानाही त्यांना आजही पाण्याच्या एका थेंबासाठी जंगल-दऱ्यांतून भटकंती करावी लागत आहे, हे वास्तव प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More