महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात पियूष बारी प्रथम…

चोपडा – येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ८१.८८ टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पियूष सचिन बारी या विद्यार्थ्याने मिळवला आहे. त्याला ९५.८० टक्के गुण मिळवले आहे.

तर विद्यालयातून द्वितीय व तृतीय क्रमांकाचा मान अनुक्रमे मृणाल शिवकुमार गुरव (९३.२०) व जान्हवी गोपाल धनगर (९०.००) यां विद्यार्थिनींनी मिळवला आहे.

विद्यालयातील सोळा विद्यार्थ्यांनी विशिष्ट योग्यता श्रेणी प्राप्त करुन यशाला गवसणी घातली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, उपाध्यक्षा छाया गुजराथी, सचिव उर्मिलाबेन गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी, समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आशिष गुजराथी यांच्यासह संस्थेच्या विविध विभाग प्रमुखांनी, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More