औरंगाबादला दाखल गुन्ह्यातील आरोपीच्या चोपडा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चोपडा (प्रतिनिधी):- सायकलवर गांजाची तस्करी करतांना औरंगाबाद पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गेल्या मार्च महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीच्या चोपडा शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून,आज गुरुवारी सकाळी ८ वाजता त्याला वेले ( ता.चोपडा) येथे राहत्या घरी अटक करण्यात येऊन औरंगाबाद शहर सिडको पोलिसांच्या हवाली करण्यात आले.


मध्य प्रदेशातून गांजा आणून त्याची मोटर सायकलवर तस्करी करतांना जशपाल रावतोडे रा.वेले (ता.चोपडा), विरेंद्रसिंग परदेशी, शुभम मोरे दोन्ही रा.औरंगाबाद, रामलाल बारेला रा.बोरअजंटी (ता.चोपडा) हे चौघे दि.१ मार्च २०२० रोजी औरंगाबाद शहरात पोलिसांच्या पथकाला आढळून आल्याने त्यांना रंगेहाथ मुद्देमालासह अटक करण्यात आली परंतू चोपड्याचे पोलीस पाहून यशपाल अमरसिंग रावतोडे हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मार्च महिन्यापासून फरार झाला होता.
याबाबत औरंगाबाद शहरातील सिडको पोलिस स्टेशन गुरनं.११०/२०२० नुसार एन डी पी एस एक्ट कलम ८,२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात चार पैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.तर एक आरोपी फरार घोषित करण्यात येऊन पोलीस त्याच्या मागावर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More