एच.टी.बी.टी. बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी किसान संघाचे चोपड्यात तहसीलदारांना निवेदन

एच.टी.बी.टी. बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी किसान संघाचे चोपड्यात तहसीलदारांना निवेदन
चोपडा – राज्यभरात कृषी क्षेत्रात एच.टी. बी.टी.बियाणे राजरोसपणे विकले जात आहे.त्याचे घातक परिणाम पर्यावरण व जैवविविधतेवर होणार आहेत.तसेच भविष्यात शेतकऱ्यांना कॅन्सर सारख्या गंभीर रोगांना सामोरे जावे लागणार आहे.त्यामुळे एच.टी.बी.टी.बियाणे बेकायदेशीर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करावी म्हणून तहसीलदार अनील गावित यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी भारतीय किसान संघाच्या तालुकाध्यक्षा कविता वाणी,सचिव भगवान न्हायदे, जिल्हा पदाधिकारी श्रीकांत नेवे,भानूदास पाटील, कुलदिपसिंग पाटील, राहूल महाजन,ऋतुवेज वाणी व शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाभर निवेदने सादर
या संदर्भात भारतीय किसान संघाने एकाचवेळी राज्यभरात आंदोलन करुन महाराष्ट्र शासनाने समोर एच.टी.बी.टी.बियाणे बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी एकमुखी आवाज उठविला आहे.जळगाव जिल्ह्यात देखील सर्वच तालुक्यांवर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
जगातील तंत्रज्ञानातील प्रगत बियाणे कंपन्यांनी मनमानी करुन जणुकिय परावर्तित केलेले बियाणे निर्माण केले.पण ते भारतीय शेतीला मारक ठरते आहे.या कंपन्यानी बियाणे व शेतीवर अधिराज्य गाजविण्यासाठी सापळा तयार केल्याचे शेतकऱ्यांना लक्षात आले आहे.पण आर्थिक बळावर बेकायदेशीर एच.टी.बी.टी. विक्री केले जात आहे.याकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

चोपडा – येथे भारतीय किसान संघातर्फे एच.टी.बी.टी.बियाणे संदर्भात निवेदन तहसीलदार अनिल गावित यांना सादर करण्यात आले.यावेळी डावीकडून भगवान न्हायदे, तालुकाध्यक्ष कविता वाणी,भानूदास पाटील, श्रीकांत नेवे,राहूल महाजन दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More