आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांना मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा फोन : कोरोना संदर्भात स्थिती जाणून घेतली
चोपडा (प्रतिनिधी)
चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांना दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा फोन आला. त्यांनी तालुक्यातील कोरोना संदर्भांत स्थितीवर सविस्तरपणे चर्चा केली.
२३ रोजी दुपारी ३:३० वाजता आमदार आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांना मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा फोन आला. यावेळी झालेल्या चर्चेत ताईंकडून विधानसभा क्षेत्रातील कोरोना रुग्ण व रुग्णांवर होणाराऱ्या उपचारासंदर्भात माहिती सविस्तरपणे जाणून घेतली. यावेळी ताईंनी आरोग्य विभाग, नगरपालिका, महसूल व पंचायत समिती, ग्रामपंचायत विभाग व लोकप्रतिनिधी समन्वय साधून काम करीत असल्याने रुग्ण लवकर बरे होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. असे सांगितले एकंदरीत प्रशासकीय यंत्रणेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.












