अज्ञात चोरट्यांनी निर्मल डेरीच दुकान फोडून पाऊने दोन लाखांचा ऐवज घेऊन पसार
चोपडा( प्रतिनिधी) चोपडा शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर असलेल्या निर्मल डेरी चे दुकान फोडून टेबल च्या ड्रॉवर मध्ये ठेवलेते १ लाख ५ हजाराची रोकड व एलईडी टीव्ही अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान आज २५ रोजी सकाळी जळगाव येथून श्वानपथक सह फिगर प्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात येऊन चोरट्यांचा शोध घेण्यात आला.विशेष म्हणजे चौरी काणारा सीसीटीव्ही कैमेरा कैद झाला असून,पोलीस सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून पोलीस चोरीचा तपास करीत आहेत.चोरीच्या घटनेने शहरात प्रचंड खडबळ उडाली आहे.शहरातील बस स्थानक जवळ असलेल्या पंचायत समिती कार्यालयासमोरील शॉप सेंटर मध्ये प्रल्हाद बळीराम पाटील रा.गणेश कॉलनी यांचे निर्मल मिल्क प्रॉडक्ट दुकान आहे.दरम्यान आज दि.२५ रोजी मध्यरात्री नंतर१:३०वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने निर्मल मिल्क प्रॉडक्ट दुकानाच्या मागील भिंतीला असलेला एक्झॉक्स फॅन काढून त्या बोगद्यातून आत प्रवेश करून दुकानातील टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेले १,५०,०००/ रुपये (दोन हजार रुपयांच्या ७५ नोटा) व दुकानातील दूध विक्री पंचवीस हजार रुपये रोख व दुकानात लावलेला एलईडी टीव्ही संच काढून लंपास केला आहे.
डेअरीचे मालक प्रल्हाद बळीराम पाटील यांनी शालकाला देण्यासाठी आज गुरुवारी दुपारी शहरातील महेश पतसंस्थेतील अकाउंट मधून दिडलाख रुपये काढून आणले होते. परंतू रात्री पर्यंत शालक दुकानावर आलेच नाहीत म्हणून प्रल्हाद पाटील यांनी रोकड दुकानात असलेल्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवून रात्री डेअरी बंद करून घरी गेले.आज दि. २५ रोजी सकाळी ६ वाजता पाटील नेहमी प्रमाणे सकाळी ६ वाजता डेअरी उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.त्या नंतर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार,पोहेकॉ.संतोष पारधी,पो.इना.विलेश सोनवणे,पो.ना.ज्ञानेश्वर जवागे,पो.ना.शेषराव मोरे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.त्यानंतर जळगाव येथील श्वान पथकासह फिगर प्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात आले.दरम्यान आज सकाळी १० वाजता श्वान पथक दाखल होऊन घटनास्थळी नेण्यात आले परंतू श्वान घटनास्थळी फिरले त्यामुळे चोरटे कोठून आले. अन कोणत्या मार्गाने बाहेर पडून फरार झाले याचा उलगडा होऊ शकला नाही.यावेळी फिंगर प्रिंट तज्ज्ञांनी घटनास्थळावरील ठसे घेतले आहेत.मात्र चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असल्याने गुन्ह्याचा तपास लवकरच लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी निर्मल मिल्क प्रॉडक्ट दुकानाचे संचालक प्रल्हाद बळीराम पाटील (वय ५०) रा. गणेश कॉलनी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला भादवि कलम ३८०,४५७ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर करीत आहेत.आहेत.मात्र चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असल्याने गुन्ह्याचा तपास लवकरच लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.या प्रकरणी निर्मल मिल्क प्रॉडक्ट दुकानाचे संचालक प्रल्हाद बळीराम पाटील (वय ५०) रा. गणेश कॉलनी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला भादवि कलम ३८०,४५७ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर करीत आहेत.












