गोरगांवले रस्तादुरूस्तीबाबत जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश…खा.श्रीमती.रक्षाताई खडसे यांच्या आदेशाने प्रत्यक्ष कामाला सुरूवात..

गोरगांवले रस्तादुरूस्तीबाबत जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश…
खा.श्रीमती.रक्षाताई खडसे यांच्या आदेशाने प्रत्यक्ष कामाला सुरूवात..
चोपडा (प्रतिनिधी..) सचिन जायसवाल
तालुक्यातील गोरगांवले बु.,खेडीभोकरी रस्ता संबंधित विभागाने त्वरित दुरूस्त करावा,अशी मागणी येथील माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी केलेली होती.यासाठी लवकरच रास्तारोको आंदोलनाची सुध्दा तयारी झालेली होती.या आशयाच्या बातम्या व्रुत्तपत्रात झळकताच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती.रक्षाताई खडसे यांनी वेळीच दखल घेऊन जळगांव सा.बां.कार्यकारी अभियंता प्रमोद सोनाग्रा यांचेकडुन माहिती जाणुन घेतली व तात्काळ रस्तादुरूस्तीबाबतचे आदेश दिलेत.
श्री.सोनाग्रासाहेब यांनी चोपडा उपविभागीय अभियंता प्रमोद सुशिर यांना रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून पांच ते आठ दिवसाच्या आत रस्तादुरूस्त करावा,अशा सुचना दिल्यात. श्री.सुशिरसाहेब यांनी माजी सरपंच श्री.बाविस्कर यांचेशी संपर्क साधुन रस्त्याची पाहणी केली.सोबत शाखाअभियंता सोपान सोनवणे हे ही होते.त्यानुसार दुसर्याच दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली.व तसा अहवाल खा.श्रीमती.रक्षाताई खडसे यांना देण्यात आला आहे.याकामी हातेड बु.चे माजी सरपंच मनोज सनेर उर्फ विक्की डॉक्टर यांचेसह सर्वच व्रुत्तपत्रांचे ग्रामीण व शहर तालुकाप्रतिनिधी,पत्रकारबंधु यांचेही विशेष सहकार्य लाभले.व माजी सरपंच श्री.बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश आल्याने पंचक्रोशितील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असुन त्यांना सर्वस्तरातुन धन्यवाद दिले जात आहेत.
याप्रसंगी गोरगांवलेचे पो.पा.विनोद पाटिल,चोसाका.चे संचालक अनिल पाटिल,क्रुषि मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटिल,खडगांवचे पो.पा.दत्तात्रय पाटिल,आदर्शवाल्मिकीनगरचे रहिवासी मधुसूदन बाविस्कर,सागर साळुंखे,सामा.कार्यकर्ते वैभवराज बाविस्कर,स्वप्निल पाटिल,तुषार सपकाळे यांनीही संबंधितांचे विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More