फायनान्स कंपन्यांची सक्तीची वसुली थांबली नाही तर शिवसेना स्टाईल ने जाब विचारू युवा सेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन….

युवा सेने मार्फत निवेदन….


चोपडा (प्रतिनिधी):- चोपडा तालुक्यात खाजगी फायनान्स कंपन्या गेल्या तीन महिन्यापासून शासनाचा नियमांचे उलंघन करून सक्तीने कर्ज वसुली करत आहेत जगभर पसरलेल्या करोना महामारीत सुद्धा बळजबरीने मायक्रो फायनान्स वाले हप्ते वसुली करत आहेत महिला बचत गटचा मध्मातून कर्ज घेणाऱ्या महिला या सर्व हात मजुरी करणाऱ्या महिला वर्ग आहे. लाॅक डाऊन मुळे मजूर वर्गाला काम धंदा मिळत नसून, कर्ज फेडायचे वांदे झाले आहे अश्या परिस्थितीत घर चालवणे सुद्धा येथे कठीण झालेले असून तरीसुद्धा मायक्रो फायनान्स कंपनी वाले धमक्या देऊन पैसे वसुली करत आहेत गव्हर्मेंट ने प्रतिबंधित शेत्र घोषित केलेल्या ठिकाणी सुध्दा मायक्रो फायनान्स कर्मचारी जाऊन दमदाटी करून पैसा वसूल करत होते.लोकांना हाताला काम धंदा नसतानासुद्धा यांनी फोन करून धमकावणे तसेच घरी जाऊन अरेरावी करणे त्या स्वरूपात पैसे वसुली सुरू केली आहे, तरी शासनाने त्याच्यामध्ये कुठेतरी लक्ष घालावे की जेणेकरून मजूर वर्गाला त्रास होणार नाही.अन्यथा युवा सेनेला शिवसेना स्टाईलने खाजगी मायक्रो फायनान्स सारख्या कंपन्यांना जाब विचारावा लागेल तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले यावेळी युवा सेनेचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष दीपक चौधरी,डाॅ.रोहन पाटील (युवा सेना शहरप्रमुख). देवेंद्र बारी (युवा शहरप्रमुखप्रमुख). नंदू गवळी. गोलू मराठे. विश्वजीत धनगर. वांटेड. गौरव पाटील. बाळा बारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More