वाढिव विजबिलांची त्वरित दुरुस्ती करा.. अन्यथा ठिय्या आंदोलनभाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचा इशारा..

वाढिव विजबिलांची त्वरित दुरुस्ती करा.. अन्यथा ठिय्या आंदोलन
भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर यांचा इशारा..
चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील गोरगावले बुद्रुक येथील भटक्या समाजातील सुया,पोत,मणी,दामन,धागादोरा विकणाऱ्या गरिब व्यक्तीस एक महिन्याचे रू.चारशे ते पाचशे मात्र वीजबिल यायचे. लॉकडाऊन काळात तेच विजबिल तीन महिन्यांचे रू.चार ते पाच हजार मात्र आलेले आहे.आधीच्या विज बिला नुसार ते फक्त रु. बाराशे ते पंधराशे मात्र यायला पाहिजे होते. म्हणजेच सुमारे रू.अडीच ते तीन हजार मात्र वीजबिल जास्तीचे आलेले आहे.ती व्यक्ति हे विजबिल भरूच शकत नाही. त्यांच्याजवळ साधा मोबाईल असल्याने सदर व्यक्तीला ऑनलाईन मिटर रीडिंग पाठवता आले नाही. त्यांना मागील महिन्याचे सरासरी वीजबिल करून पाठवणे गरजेचे होते. ज्यांनी ऑनलाईन मिटर रिडिंग पाठवले आहे, त्यांना नियमानुसार बिल आकारणीस हरकत नाही. ही परिस्थिती तालुक्याभरातील विज ग्राहकांची झाली आहे. विजबिल दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे गेले असता तेथील अधिकारी, कर्मचारी आधी पूर्ण विजबिल भरायला सांगतात. ही एक प्रकारे वीज ग्राहकांची लूटच आहे.अशी स्पष्टोक्ती भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
मागील वर्षी ग्रामीण व शहरी भागात तसा आदेश नसतांना महावितरण’कडून चालु व सुरू असलेले मीटर काढून नवीन जास्तीचे विजबिल आकारणी करणारे मीटर बसविण्यात आलेले आहेत. इतर तालुक्यात वीज ग्राहकांनी याबाबत आंदोलन केले व त्याला तेथील सामा.संस्था संघटना,सर्व पक्षिय पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांनी पाठिंबा दिला, त्या ठिकाणी ही मोहीम थांबवण्यात आली होती. आताही इतर तालुक्यात वाढीव वीजबिलांबाबत विरोध होताच तिथे जास्तीचे विजबिले महावितरण कंपनी कडुन दुरुस्त व कमी करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे चोपडा तालुक्यात सुद्धा महावितरण कंपनीने वाढीव वीज बिलांची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा तालुक्यातील विजग्राहकांतर्फे चोपडा तहसील कार्यालयासमोर तिव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख व मार्केट कमिटीचे माजी संचालक जगन्नाथ टि. बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी या पत्रकान्वये दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More