प्रत्येक गावात दफनभुमी साठी जागा द्या
भिल समाज विकास मंच चोपडा …
प्रत्येक गावात दफनभूमी जागा तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी भवन उभारणे आदी मागणयांसाठी
भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य शाखा चोपडा यांनी 22 जुलै पासून डिजीटल आंदोलनास सुरूवात केली त्यात चोपडा तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात महाराष्ट्र व केंद्र सरकार ने आदिवासी समाजाच्या विकासासाठी काढलेल्या योजनांमध्ये क्षेत्राचा भेदभाव करू नये आदिवासी विभागाने सरसकट क्षेत्रातील आदिवासींनी योजनांचा लाभ घ्यावा जळगाव धुळे अहमदनगर या तिन्ही जिल्हातील आदिवासी भिल समाजाच्या सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय व्यापार करण्यास मदत द्यावी वंचित आदिवासी भिल समाजाला घरकूलांचा लाभ द्यावा निवेदनात आदी मागण्यांचा समावेश आहे . निवेदन देतांना भिल समाज विकास मंच जळगाव जिल्हा सचिव दिपक अहिरे चोपडा तालुकाध्यक्ष समाधान पवार तालूका सचिव आनंदा सोनवणे सुमित मोरे आधार ठाकरे जितेंद्र भिल सागर पारधी .आदी पदधिकारी उपस्थित होते












