मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धांच्या सन्मान
चोपडा प्रतिनिधी — महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना नेते व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व चोपडा विधानसभेच्या विद्यमान आमदार सौ लताताई सोनवणे यांच्यावतीने चोपडा तालुक्यात कोरोनाच्या काळात कोरोना योद्धाची भूमिका बजावणाऱ्या चोपडा तालुक्यातील सर्व सन्माननीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर ,वार्ड बॉय, नर्स ,पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, तहसील प्रशासन इत्यादी कर्मचाऱ्यांचा शाल ,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .
सदर कार्यक्रम चोपडा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता .सदर कार्यक्रमप्रसंगी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, डॉ मनोज पाटील वैद्यकीय अधीक्षक, डॉ प्रदीप लासूरकर तालुका वैद्यकीय अधिकारी ,संदीप आराक एपीआय ग्रामीण पोलीस स्टेशन यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .त्यात राजेंद्र पाटील शिवसेना तालुकाप्रमुख ,आबा देशमुख शिवसेना शहर प्रमुख ,नरेश महाजन शिवसेना शहर प्रमुख, रोहिणी पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी ,हरीश पाटील जि प सदस्य ,एम व्ही पाटील माजी उपसभापती पंचायत समिती ,भैय्या पवार शिवसेना गटनेता ,किशोर चौधरी नगरसेवक ,राजाराम पाटील नगरसेवक ,एस डी सोनवणे जिल्हा नियोजन समिती सदस्य ,सुकलाल कोळी तालुका संघटक, दीपक चौधरी, गोपाल चौधरी ,डॉ रोहन पाटील, सुनील पाटील ,नंदू गवळी प्रा प्रीती सर्वैया ,तुषार पाटील ,गोलू मराठे ,भरत साळुंके इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच कोरोना योद्धाचा सन्मान करण्यात आला त्यात डॉ मनोज पाटील, डॉ गुरुप्रसाद वाघ, डॉ शरद पाटील ,डॉ पुनम पाटील, डॉ श्रद्धा पवार, डॉ राजाभाऊ चव्हाण ,डॉ किरण पाटील, डॉ धनंजय पाटील, डॉ महेंद्र पाटील, डॉ अक्षय पाटील ,डॉ नरेंद्र पाटील ,डॉ राहूल पाटील, डॉ राहुल चौधरी, डॉ विनायक पाटील, डॉ दिनेश चौधरी ,डॉ पंकज पाटील, डॉ दीपक पाटील, डॉ मयूर सोनवणे ,डॉ विश्वास पाटील, डॉ स्नेहा सोनार, डॉ मोनिका हांडे, डॉ अमित देसले याशिवाय प्रयोगशाळा सहाय्यक राकेश भामरे, दीपक गोराने वाहन चालक सुरज डोंगरे कक्ष सेवक सुरेश चावरे ,गोपाल खैरनार, विलास टेके, हंसराज बिऱ्हाडे ,विनोद चावडे ,चंद्रकांत पाटील, सफाई कामगार राहुल दाभाडे ,प्रशांत मामु ,ऋषी महाजन ,मयुर नेवे ,राकेश पाटील इत्यादी कोरोना योद्धांच्या सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबा देशमुख यांनी केले तर मनोगत एम व्हि पाटील यांनी व्यक्त केले तसेच सूत्रसंचालन प्रशांत पाटील यांनी केले तर आभार डॉ मनोज पाटील यांनी मानले…..














