आयोध्येत भूमिपूजन तर चोपड्यात श्रीराम मंदिर कारसेवकांचा सत्कार

आयोध्येत भूमिपूजन तर चोपड्यात श्रीराम मंदिर कारसेवकांचा सत्कार
राष्ट्रीय सुरक्षा मंचचा स्तुत्य उपक्रम
चोपडा – बहुचर्चीत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु असताना १९९१ साली चोपड्यातून कारसेवेसाठी गेलेल्या रामभक्त कार्यकर्त्यांचा सत्कार राष्ट्रीय सुरक्षा मंचद्वारे करण्यात आला.या उपक्रमात ३७ कसरसेवक वा त्यांच्या कुटुंबीयांना गौरविण्यात आले.
प्रारंभी सकाळी दहा वाजता गांधी चौकातील श्रीराम मंदिरात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या मोजक्या कार्यकर्त्यांनी सुरक्षीत अंतर बाळगत पूजन केले.तसेच ३७ कारसेवकांच्या निवासस्थानी जावून त्यांना शाल,श्रीफळ व श्रीराम प्रतिमा देवून गौरविण्यात आले.त्यामध्ये जेष्ठ कारसेवक तिलकचंद शहा,माजी आ.कैलास पाटील,अनिल पालिवाल,अनिल वानखेडे,दिलीप नेवे,सोपान जाधव(कठोरा),शामसिंग परदेशी,पवन अग्रवाल,घनःश्याम अग्रवाल,विश्वनाथ पाटील ( कठोरा),प्रकाश वाघ, पुनम भावसार,पांडुरंग चौधरी,राजूअण्णा वाणी,मुन्ना शर्मा,संजिव पाटील, विनोद पाटील, पंडित पाटील,किशोर पाटील (वेले),राजेंद्र शिंपी,सुनिल माळी,छोटू माळी,रेऊबा धनगर,नविन दिसावल,उल्हास गुजराथी, अशोक शहा (चहार्डी),राजेंद्र बडगुजर,रामदास गंभीर,कृष्णदास गुजराथी, तसेच दरम्यानच्या काळात मयत झालेले कारसेवक स्व.रघुनाथ चौधरी,विठ्ठल पाटील, श्रीकृष्ण टिल्लू, सतिष गुजराथी, गोपाळ गवळी, रवींद्र शुक्ल,हेमंत बारी यांचा समावेश आहे.
यावेळी राष्ट्रीय सुरक्षा मंचचे संयोजक गोपाळ पाटील, सदस्य अॅड.धर्मेंद्र सोनार,यशवंत चौधरी,पंकज सुभाष पाटील,गजेंद्र जायसवाल, नरेंद्र पाटील, शाम सोनार,मनोज विसावे,सौरभ नेवे,संदीप पाटील, अॅड.शैलेष शर्मा,सुनिल सोनगिरे,आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More