युवाशक्ती संघटनेचा दणका- स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित

युवाशक्ती संघटनेचा दणका- स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित


चोपडा(प्रतिनिधी) येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य वितरणात होत असलेल्या अनियमितता व गैरव्यवहाराची चौकशी होऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून सदर स्वस्त धान्य दुकानदाराचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे. चोपडा येथील युवाशक्ती संघटनेने सदर गैरव्यवहाराला वाचा फोडल्याने आता आपल्याला आपल्या हक्काचे स्वत धान्य मिळेल याचा आनंद गोरगरीब जनतेला झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की चोपडा येथील रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांना कमी धान्य दिले जात असल्याच्या व खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या अनेक तक्रारी लोकांनी युवाशक्ती संघटनेकडे केल्या होत्या. त्या अनुशंघाने गरजू लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी युवाशक्ती संघटनेने धडक मोहिम सुरु केली. चोपड्यात रेशनचा खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार करून युवाशक्ती संघटनेने त्रयस्थ अधिकारी नेमण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सागरभाऊ ओतारी, जितेंद्र शिंपी, चिरागोद्दीन शेख तसेच संघटनेचे इतर कार्यकर्ते यांनी पुरवठा तपासणी अधिकारी श्री संतोष बावणे यांच्यासह चोपडा येथील स्वस्त धान्य दुकानदार सौ सुनिता शाम सोनार, लहान भोईवाडा, चोपडा यांच्या स्वस्त धान्य दुकानात धडक दिली. सौ सुनिता शाम सोनार यांचे दुकान त्यांचे पती श्री शाम सोनार हे सांभाळतात. यांच्या स्वत धान्य दुकानाच्या कार्यप्रणालीबाबत अनेक तक्रारी होत्या. प्रत्यक्षात लोकांना कमी धान्य वाटप करून इ-पॉस मशीनवर जास्त वाटप दाखवणे, लाभार्थ्यांना पावती न देणे, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य कमी देणे, योजना निहाय धान्य वाटपाच्या याद्या नसणे, अभिलेखे नसणे, धान्यसाठा पडताळा न देणे अश्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात आढळून आल्या. कोरोना काळात होत असणारा हा गैर व्यवहार, योजनांमधील भ्रष्टाचार हि गंभीर बाब असल्याचे निष्पन्न झाल्याने सौ सुनिता सोनार यांचा स्वत धान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांच्या आदेशात म्हटले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये घबराट उडाली आहे.


युवाशक्तीने हजारो नागरिकांना मिळवून दिला आपला हक्क –
युवाशक्ती संघटनेने आल्येल्या तक्रारींच्या अनुशंघाने रेशनच्या या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून आतापर्यंत हजारो लोकांना त्यांचे हक्काचे धान्य मिळवून दिले आहे. गरिबांच्या हिस्शाचे ओरबाडून खाणाऱ्या भ्रष्टाचारी रेशन माफियांना यामुळे लगाम बसेल असा विश्वास निर्माण झाला आहे. वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी युवाशक्ती संघटना काम करीत आहे.


युवाशक्ती संघटनेचे आवाहन
वर्षानुवर्षांपासून तुमच्या नावावर काही दुकानदार धान्य चोरत आहेत. चोरांना खुलेआम लुट करण्याची संधी देऊ नका. आपल्या हक्काचे पूर्ण धान्य दुकानदाराकडून अवश्य घ्या. दुकानदार जर तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करत नसेल किंवा अरेरावीची भाषा करत असेल तर युवाशक्ती संघटनेला संपर्क करा. विविध शासकीय योजनेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आढळून आल्यास, कुणा गरजूवर अन्याय होत असल्याचे लक्षात आल्यास जनतेने निसंकोचपणे आपल्याशी संपर्क साधावा व आपल्या तक्रारी मांडाव्या असे आवाहन युवाशक्ती संघटनेतर्फे करण्यात आले आहे. अव्यवस्था, भ्रष्टाचार, अन्याया विरुद्ध आपला लढा असुन गरजू गरीब वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सदैव कटिबद्ध आहे.


रेशन मधील भ्रष्टाचार लवकरच उघडकीस येईल – सागर ओतारी.
सदर रेशन दुकानावर फक्त पुढील आदेश होईपर्यंत निलंबनाची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सुनील सूर्यवंशी केली आहे. परंतु दुकानदाराचा भ्रष्टाचार पाहता त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण यापूर्वी अशा स्वरूपाच्याच भ्रष्टाचाराबाबत याच पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील काही दुकानांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. मग या दुकानदारासाठी वेगळा निर्णय का? अश्याप्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्या दुकानदारांवर जर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली तर इतर दुकानदारांवर वचक बसेल व भ्रष्टाचार नक्कीच थांबेल. जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणात रेशन घोटाळा सुरु आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अर्थपूर्ण सम्बंधान्शिवाय हे शक्य नाही. लवकरच या संपूर्ण प्रकराची तक्रार वरिष्ठ पातळीवर करू. तरीदेखील हे थांबले नाही तर सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी युवाशक्ती संघटना आक्रमक भूमिका घेत आंदोलन करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More