नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा निमगव्हाण ग्रामस्थ

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा – निमगव्हाण ग्रामस्थ
चोपडा – तालूक्यातील निगव्हाण येथील ग्रामस्थांतर्फे गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे निमगव्हाण गावासह परिसरातील सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या नुकसानीचे पंचनामे करून शासनातर्फे मदत मिळावी यासाठी नायब तहसीलदार राजेश पौळ यांसह तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन आले.
सदर निवेदनावर गावातील १५० शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत.
निवेदन देते वेळी गावातील ग्रामस्थ दिलीप रुपसिंग पाटील, धनेश भाटिया, लोटन गबा पाटील, अनिल शिवाजी बाविस्कर, राजेंद्र चिंतामन पाटील, देवानंद पाटील, मंगल छन्नू पाटील, टेमलाल दौलत पाटील , शशिकांत बिऱ्हाडे, वकील बाविस्कर, ढेकू पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More