आईजा महाधिवेशनाचे उद्घाटन थाटात संपन्न

आईजा महाधिवेशनाचे उद्घाटन थाटात संपन्न

चोपडा ( प्रतिनिधी ) — ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनचे प्रथम राष्ट्रीय महाअधिवेशनचे उद्घाटन अगाशी जैन तिर्थ येथे थाटात माटात व उत्साहात संपन्न झाले असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडीया , सौ.सुनीता हुंडीया , सुप्रसिद्ध जैन तत्वचिंतक व अभ्यासक रमेशभाई मेहता राज्य अध्यक्ष दिलीप कावेरीया आदि मान्यवराच्या हस्ते श्री सरस्वती वंदना व दीपप्रज्वलन करण्यात आले
कार्यक्रमाच्या प्रारंभी जैन दादा मुनीसुरतश्वरीजी यांच्या मंदिरापर्यंत सर्व जैन पत्रकारांची हार्दिक हुंडीया यांच्या नेर्तुत्वाखाली वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली तदनंतर उद्घाटन समारंभात प्रदेश अध्यक्ष कावेरीया यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला अधिवेशनात प्रथम सत्रात देश भरतातून उपस्थित जैन पत्रकारानी आपला परिचय करून देत असतानाच असोसिएशन तर्फे स्वर्ण गुलाबपुष्प देऊन श्री हार्दिक हुंडीया यांनी सर्व पत्रकाराचे स्वागत केले तदनंतर द्वितीय सत्रात वसई विरार मनपाचे माजी महापौर सौ प्रविणाबेन ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जैन पत्रकाराच्या विविध समस्या तसेच असोसिएशनचे उपक्रमाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली अधिवेशनात देशभरातून उपस्थित जैन पत्रकारामध्ये सर्व श्री राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेन्द्र मेहता ( कर्नाटक), कल्पेश जैन (मलाड- महा), मीडिया प्रभारी माणकलाल भंडारी (भिलमाड), संजय जैन (झाबुआ- मध्य प्रदेश), मनोज बोथरा ( छत्तीसगढ ), प्रदीप पगारिया, हिमांशू जैन (उज्जेन), विमल जैन (मेवाड प्रतापगड), दिनेश जैन (तामिळनाडू) , नितेश जैन ( सेलम), दिनेश जैन (हैदराबाद), महेंद्र सकलेचा (औरंगाबाद ) तर खान्देशातुन जेष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल, आईजाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सद्स्य लतीश जैन , आकाश जैन आदी शेकडो पत्रकाराची देशभरातुन उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More