चोपडा तालुक्यातील अडावद केंद्र अंतर्गत पल्स पोलिओ जनजागृती मोहीम..

(चोपडा प्रतिनिधी):- चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदिप लासुरकर यांच्या सूचनेनुसार, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णूप्रसाद दायमा, डॉ.अर्चना पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली पल्स पोलिओ लसीकरणाच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद अंतर्गत सर्व भागात ०ते५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना १७ जानेवारी२०२१ रविवार पोलिओ लसीकरण करण्यात येणार असल्याने आरोग्य केंद्रा मार्फत लोकांना पोलिओ जनजागृती होण्यासाठी दवाखाने, चौका चौकात, सार्वजनिक ठिकाणी, आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्य कर्मचारी भिंतीवर पोलिओच्या स्लोगन लिहितांना. आरोग्य सेवक-विजय देशमुख,महेंद्र पाटिल, दिनकर वाघ, अविनाश चव्हाण,यांच्या सोबत आरोग्य सहाय्यक-प्रकाश पारधी, समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ. दिनेश चौधरी, डॉ. राहुल पाटिल सह पन्नालाल महाजन, गणेश महाजन, धुडकू वारडे, बळवंत पुजारी, भुषण देवराज, जनजागृती साठी आदी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More