श्रीराम मंदिर निर्माणात योगदान देणारा खरा हिंदू – ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज

श्रीराम मंदिर निर्माणात योगदान देणारा खरा हिंदू – ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज

चोपडा –
ऎतिहासिक निकालानंतर बहुप्रतिक्षीत राम मंदिर निर्माण होत आहे याचा आनंद आहे.मंदिर निर्माण आपल्या हातून होणार आहे. जीवनात आलेला अविस्मरणीय क्षण आला आहे.पण त्यासाठी योगदान देवून योग साधेल तो खरा हिंदू..!मंदिर निर्माण आपला प्राण आहे.त्यासाठी प्रत्येक हिंदूने काम करणे गरजेचे आहे.राम मंदिराशी अनेक वर्षाचा इतिहास जुळला आहे,मंदिरही ऎतिहासिक होणार आहे त्यामुळे सर्वोच्च निधी देवून तालुक्याने इतिहास निर्माण करावा असे आवाहन वारकरी संप्रदायाचे तालुका उपाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पुनगावकर यांनी येथे केले.
आयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीच्या पावन तिर्थक्षेत्रावर विशाल राम मंदिर निर्माणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे.चोपडा तालुक्याचे निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या सोहळ्यात ते बोलत होते.
प्रारंभी तुषार पाटकर यांनी सामूहिक गित सादर केले.प्रास्ताविक आणि परिचय अभियान प्रमुख संदीप साळूंखे यांनी केले.दिप प्रज्वलन व श्रीराम प्रतिमा पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथींचा सत्कार राजेश पाटील, डॅा.मनोज साळूंखे,संदीप साळूंखे,मनोज विसावे यांनी केला.अभियानाबाबतची विस्तृत माहिती कृष्णा महाजन यांनी सादर केली.

याप्रसंगी मंचावर रा.स्व.संघ जळगाव विभाग संघचालक राजेश पाटील,तालुका संघचालक डॅा.मनोज साळूंखे,वर्डीच्या सुकनाथ बाबा मठाचे मठाधिपती प.पू.दीनानाथ महाराज,अ.भा.वारकरी संप्रादयाचे तालुका उपाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पुनगावकर तसेच श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख रामदास बंडू पाटील,शीतलनाथ महाराज मठाचे मठाधिपती काशिनाथ महाराज उपस्थित होते.
रामसेवकांचा सत्कार
यावेळी उद्योजक मनिष गुजराथी यांनी दीनानाथ महाराज यांना धनादेश देवून निधी समर्पण केले.तसेच आतापर्यंत राम मंदिर निर्माणासाठी भरीव निधी देणारे दाते
दिपक लोहाणा,अमिताभ अग्रवाल,गोपाळ पाटील, नरेंद्र पाटील,नंदलाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
राममंदिर ते राष्ट्रमंदिर निर्माण – डॅा.मनोज साळूंखे
समारंभाच्या समारोप प्रसंगी बोलतांना तालुका संघचालक डॅा.मनोज साळूंखे म्हणाले की,समाजात सुसंसवाद निर्माण करण्यासाठी हे अभियान आहे.समाज एकजूट करण्यासाठी प्रत्येक घरोघरी जावून प्रयत्न करणार आहोत.निधी संकलन समिती समाज आणि मंदिर निर्माणामधील पुल म्हणून काम करेल.अभियान म्हणजे सागर मंथन आहे.त्यातून निर्माण होणारे अमृत महत्वाचे आहे.राममंदिर ते राष्ट्रमंदिर निर्माण करण्याचे काम याद्वारे आपल्याला करायचे आहे.विशाल कान करीत असताना अडचणी येतील पण सर्व समाज एकजूट निर्माण करणार आहोत.
चोपडा तालुक्यात व शहरात अभियानाची सुरूवात दि.१५ जानेवारी पासून सुरु होणार आहे.तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत या अभियानाच्या माध्यमातून पोहचले जाणार असून निधी संकलन केले जाणार आहे.

याप्रसंगी अभियानाचे पालक बापूराव मांडे,माजी आमदार कैलास पाटील,जेष्ठ उद्योजक घनःश्याम अग्रवाल,मनिष गुजराथी,तिलकचंद शहा,मुन्ना शर्मा,प्रकाश पाटील, भरत सोनगिरे,यशवंत चौधरी,माजी नगरसेवक पप्पू सोनार,गोपाळ पाटील,प्रेम घोगरे,उल्हास गुजराथी,प्रवीण जैन,लक्ष्मण शेटी,उद्योजक बापू महाजन,कविता वाणी, श्रीकांत नेवे,गिरिष माळी,शाम सोनार,पुनमचंद भावसार,राजेंद्र बडगुजर आदिसह मोठ्या प्रमाणवर कारसेवक व शेकडो स्वयंसेवक उपस्थित होते.
सु‌त्रसंचालन कुशल गुजराथी यांनी केले.आभार मनोज विसावे यांनी मानले.

फोटो कॅप्शन – श्रीराम मंदिर निधी संकलन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर डावीकडून डॅा.मनोज साळूंखे,ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज,प.पू.दीनानाथ महाराज,राजेश पाटील, काशिनाथ महाराज,रामदास पाटील दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More