प्रत्येकाने वाचावे म्हणजे तो वाचेलपंकज विद्यालयात मयूर पाटील यांचे प्रतिपादन….

प्रत्येकाने वाचावे म्हणजे तो वाचेल
पंकज विद्यालयात मयूर पाटील यांचे प्रतिपादन….

चोपडा प्रतिनिधी – येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज प्राथमिक विद्यालयात वाचनाची गती वाढविण्यासाठी साठीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते .
प्रत्येकाने वाचावे म्हणजे तो वाचेल , प्रत्येकास वाचनाची आवड असावी , जगविख्यात व यशस्वी व्यक्तींना वाचनाची आवड असते . संगणकाचे जनक बिल गेट्स हे वर्षांतून किमान 50 पुस्तकांचे वाचन करतात , महिन्यातून सरासरी 4 ते 5 पुस्तकांचे वाचन करतात .वाचनास अनन्यसाधारण महत्त्व आहे .
उत्तम आरोग्यासाठी , शरीरासाठी जसे सकस आहाराची गरज असते त्याप्रमाणे उत्तम मनासाठी चांगल्या विचारांची म्हणजे पुस्तक वाचनाची अत्यंत आवश्यकता असते. वाचनाची गती कमी असण्याची कारणे , वाचनाची गती कशी वाढवावी स्पष्ट केले.
स्पीड रीडिंग टेक्नॉलॉजी काय आहे हे स्पष्ट केले .तसेच स्वामी विवेकानंदाची वाचनाची पध्दत स्पष्ट केली.
वाचनात डोळे , मेंदू व मेडिटेशन महत्त्वाचे आहे , प्रत्येक एक मिनिटात वाचनाचा वेग 100 ते 250 शब्द हा साधारण वेग आहे. हवर्ड बर्क या वाचकाने प्रति एका मिनिटात 25000 शब्दांचे वाचन करून गिनीज बुक रेकॉर्ड केला आहे .तसेच अँनी जोन्स या वाचकाने 784 पेजचे पुस्तक अवघ्या 47 मिनिटात वाचन करून फास्टर रिडींग स्पर्धेत चॅम्पियन ठरले आहेत.निरंतर सराव , प्रयत्न केला तर निश्चितच वाचनाची गती वाढते .
सदर प्रशिक्षण प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील , सी एस जाधव , अनिल पाटील, सी आर चौधरी , योगेश चौधरी , डी एम जैस्वाल , आर डी पाटील , गायत्री शिंदे , जयश्री पाटील , धनश्री जावळे , मनोज अहिरे , प्रशांत पाटील , प्रफुल्ल महाजन, स्वप्निल ठाकूर, सचिन लोखंडे , नितीन वाल्हे, गोपाल पाटील इत्यादी शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी महेश गुजर यांनी परिश्रम घेतले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More