चक्क! गोमातेचे डोहाळे जेवण आणि शहरात चर्चेला उधाण ….

चक्क! गोमातेचे डोहाळे जेवण आणि शहरात चर्चेला उधाण ….

चोपडा प्रतिनिधी —
आजही समाजात भूतदया जागृत आहे . प्रत्येक जण जगा आणि जगू द्या या मंत्रा नुसार आपल्या आयुष्यात जगत असतोच पण काही मंडळी त्याहीपुढे जाऊन जगण्याच्या प्रयास करते त्याच्याच एक प्रत्यय चोपडा शहरात पाहावयास मिळाला

गोमातेचे विधिवत डोहाळे जेवण करण्याचा उपक्रम करण्यात आला . भारतीय किसान संघाच्या तालुकाध्यक्ष कविता वाणी व त्यांच्या परिसरातील महिलांनी गोमातेच्या पहिल्या गर्भधारणेनंतर चक्क डोहाळे जेवणाचा कार्यक्रम चोपडा शहरातील मोठा माळीवाडा भागात पार पाडला . सौ कविता वाणी या भारतीय किसान संघाच्या तालुकाध्यक्ष असण्यासोबतच प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी देखील आहेत

शेतीत त्यांनी विविध प्रयोग केल्याने व शेती निगडीत उद्योग निर्माण केल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. त्यांनी आपल्या वडती ( तालुका चोपडा) येथे पाळलेल्या गायी पैकी प्रथमच गर्भधारणा प्राप्त केलेल्या गाईला घरी आणले तिच्यावर नवीन झुल चढवून नवी साडी नेसल्या सारखा गायीला साज दिला . गोड-धोड पदार्थ खायला दिले , गोमातेचे पूजन केले , डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात ज्याप्रमाणे गीते गायली जातात ते पारंपारिक कितीही गायन केली हा सगळा प्रकार पाहून गाय हरकून गेली असावी. गोमातेच्या डोहाळे जेवणाचा या कार्यक्रमाची शहरात जोरदार चर्चा होत आहे .गोमातेच्या डोहाळे जेवणाचा उपक्रमात दीपश्री मेने , सोनाली वाणी , शितल माळी , मंजुषा आडगावकर ,जयश्री भदाणे, रत्ना मेणे , आर्यमा वाणी, संगमनेरकर बाई ,गोडमबाई माळी , विद्या बारी आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More