अखेर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेची घंटा वाजली पंकज विद्यालय केले विद्यार्थ्यांचे स्वागत
चोपडा प्रतिनिधी —(सचिन जैस्वाल)
दि 16 मार्च ते दि 26 जानेवारी दरम्यान कोरोनाच्या महामारीमुळे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना व शाळांना सुट्टी होती .काही दिवसांपूर्वी इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग सुरू झाले व दि 27 जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे तब्बल दहा महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली .

चोपडा येथील पंकज विद्यालयात प्रथम दिवशी या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिला दिवस शासनाच्या अटींचे पालन करून उत्साहात भरविण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व मार्गदर्शन केले .

योगेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शालेय नियम , कोरोना संसर्ग जागृती बाबत मार्गदर्शन केले .इतर सहकारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे तापमान तपासणे ,सॅनिटायझर लावणे ,सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी जबाबदारी पार पाडली .
विशेष बाब म्हणजे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची 90 टक्के उपस्थिती होती , दुसऱ्या दिवशी इयत्ता पाचवी ते सातवीच्या ब तुकड्यांच्या वर्ग भरविण्यात येणार असल्याचे सांगितले .सदर प्रसंगी सीआर चौधरी ,प्रफुल्ल महाजन ,स्वप्नील ठाकुर , मयुर पाटील , सचिन लोखंडे ,धनश्री जावळे ,नितीन वाल्हे ,सचिन पवार आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले ….












