प्रमाणभाषेबरोबर बोलीभाषेचा सम्मान करावा-,राजेंद्र पारे

‘ प्रमाणभाषेबरोबर बोलीभाषेचा सम्मान करावा’–
राजेंद्र पारे

चोपडा प्रतिनिधी सचिन जैस्वाल

चोपडा न्यायालय परिसरात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने चोपडा वकिल संघ व विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित केले होते.त्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक राजेंद्र पारे यांना आमंत्रित केले होते.
महाराष्ट्रात बहुतांश मराठी भाषेचा वापर होत असतो.दर दहा बारा कोसांवर भाषा बदलत असते. बोलीभाषा ही प्रमाणभाषेला समृद्ध करीत असते म्हणून प्रत्येक बोलीभाषेचा सन्मान केला पाहिजे.सर्व व्यवहार बोलीभाषेतून झाला की ती भाषा आपली आहे म्हणून मोठे भूषण वाटते.न्यायालय,प्रशासकीय विभाग यात मराठीचा वापर व्हावा असे आपल्या व्याख्यानातून राजेंद्र पारे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष- चोपडा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पळसपगार साहेब, प्रमुख पाहुणे- चोपडा न्यायालयाचे सह न्यायाधीश म्हस्के साहेब ,चोपडा वकिल संघाचे अध्यक्ष किरण जाधव, सचिव अॅड.विलास बाविस्कर, उपअध्यक्ष मिलिंद बाविस्कर व पूर्ण स्टॉप उपस्थित होते.प्रस्तावना-राजेंद्र ठाकुर भाऊसाहेब तर आभार विलास बाविस्कर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More