चोपड्यात नगरपालिका व रोटरी व तर्फे पोलिओ लसीकरण कार्यक्रमास सुरुवात.

चोपड्यात नगरपालिका व रोटरी व तर्फे पोलिओ लसीकरण कार्यक्रमास सुरुवात.
चोपडा वार्ताहर-
भारतात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण कार्यक्रम रविवारी, 31 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यात आला त्या अनुषं गाने नगरपरिषद रुग्णालय चोपडा येथे सकाळी 8.00 वाजता काही मुलांना पोलिओ थेंब देऊन नगराध्यक्षा सौ. मनीषा ताई चौधरी यांच्या हस्ते तसेच आरोग्य सभापती सौ सुप्रिया सनेर, रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव, डॉ चंद्रकांत बारेला वैद्यकीय अधिकारी न.पा.चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात झाली.
सदर लसीकरण कार्यक्रम 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाईल .


पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणार्‍या राष्ट्रीय लसीकरण दिन (एनआयडी) यापूर्वी 17 जानेवारीपासून ठरविण्यात आला होता परंतु देशभरातील कोरोनव्हायरस लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांची पोलिओ लसीकरण मोहीम १ जानेवारीपासून सुरू होऊन ती २ फेब्रुवारीपर्यंत चालु राहील यात वय वर्ष 0ते5 वयोगटातील मुलांना पोलिओ थेंब दिले जातात.पोलिओ लसीकरण कार्यक्रम वर्षातून दोनदा घेण्यात येतो, सहसा सुरुवातीच्या महिन्यात.नियमीत पोलिओ लस प्रत्येक जन्माच्या वेळी एकदा, 6 आठवड्यात, १० आठवड्यात आणि 14 आठवड्यांनी दिली जाते आणि त्यानंतर वयाच्या 5 वर्ष पर्यंत आवश्यक असल्यास अधिक दिले जाते.
पोलिओ रविवार म्हणून ओळखल्या जाणार्‍या पल्स पोलिओ कार्यक्रमाची सुरुवात रविवारी होते, ज्याला राष्ट्रीय लसीकरण दिन देखील म्हटले जाते.
शासनाचा कोविड प्रोटोकॉल प्रमाणे शारीरिक अंतर, फेस मास्क आणि हँडवॉशिंग सारखे सावधगिरीचे उपाय बाळगून पोलिओ लसीकरण मोहीम आयोजित केली त्यात चोपडा रोटरी चे सचिव रुपेश पाटील, एम डब्लू पाटील,चंद्रशेखर साखरे,भालचंद्र पवार, आशिष जैस्वाल सोबत फार्मासिस्ट अजय जयस्वाल, लॅब टेक्नीशियन पल्लवी देशमुख, कीर्ती महाजन, अधीपरिचालक सचिन शिंदे, फार्मासिस्ट नदीम शेख तसेच सर्व आशा वर्कर्स,बूथ वरील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More