चोपडा येथील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

चोपडा येथील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
चोपडा प्रतिनिधी –
येथील अनंतनगर ,यावल रोड भागातील 31 वर्षीय तरुणी कु प्रांजली देविदास राजपूत हिने 2 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना घडली आहे .
पावणे दहा वाजेच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आल्यावर ताबडतोब उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले . डॉ पंकज पाटील यांनी तपासणी केली असता कु प्रांजली हिस डॉक्टरांनी मयत घोषित केले .


डॉ पंकज पाटील यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला खबर दिली की, कु प्रांजली देविदास राजपूत वय वर्षे 31 अनंत नगर प्लॉट नंबर 51 चोपडा जिल्हा जळगाव हिने गळफास घेतल्याने तिला तिचे नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले .चोपडा शहर पोलीस स्टेशनला सी आर पी सी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .अधिक तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पीआय अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना संतोष पारधी अधिक तपास करीत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More