हुतात्मा वीर कन्हैया बंधूंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन
चोपडा(प्रतिनिधी)शिवसेनेचे शिलेदार व लढवय्या हुतात्मा वीर कन्हैया बंधूंच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना व युवासेनेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा वीर बाळासाहेब कन्हैया तथा हुतात्मा वीर मुरलीधर कन्हैया यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण शिवसेनेचे मुरलीधर कन्हैया याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक तथा उपजिल्हाप्रमुख दिपक जोहरी,विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, माजी तालुका प्रमुख देवेंद्र सोनवणे, माजी शहर प्रमुख तथा नगरसेवक महेंद्र धनगर,शेतकी संघ संचालक प्रल्हाद पाटील,वेळोदा माजी सरपंच रमाकांत बोरसे
सुनिल भाऊ बडगुजर, शाम परदेशी, सुभाष शिंपी,शशी कन्हैया,श्रीराम गायकवाड, पंकज चौधरी, लघु कन्हैया, गणेश कन्हैया, मनोज माळी, ज्ञानेश्वर पाटील, दिनेश कन्हैया, चंदू महाजन,विलास सुर्यवंशी,समस्त नाभिक समाज,यासह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते. यावेळी हुतात्मा वीर कन्हैया बंधू प्रतिष्ठान तर्फे नाभिक समाजाचे विनोद निकम पत्रकार यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांचे कुटुंबीय आज पाच हजाराची आर्थिक मदत देण्यात आली.












