“शेण आणि कापसाच्या झाडा पासून बनविलेल्या विटा – नैसर्गिक इंधन ” या विषयावर कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी (सचिन जैस्वाल)

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र ची सूरूवात ही सन 1992 पासून होऊन त्यात विविध विभाग कार्यरत आहेत. महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ही 100 असून पदव्यत्तर महाविद्यालयात फार्मास्युटिक्स तसेच फार्माकॉगनोसी अभ्यासक्रम कालांतराने सूरू करण्यात आले आहेत. नुकतेच शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून महाविद्यालयात पदविका (डी.फार्मसी) अभ्यासक्रम सुरू करण्यास शासन तसेच विविध संस्थान कडून 60 विद्यार्थी संख्ये करीता मान्यता मिळाली आहे. बी. फार्मसी महाविद्यालयास एन. बी. ए चे मानांकन प्राप्त असून आय. एस. ओ. प्रमाणीत आहे.


बी. फार्मसी महाविद्यालयात उन्नत भारत अभियान अंतर्गत समाज हितास्तव विविध मार्गदर्शनपर उपक्रम घेण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील फार्माकॉग्नॉसी विभागाने “शेण आणि कापसाच्या झाडा पासून बनविलेल्या विटा – नैसर्गिक इंधन ” या विषयावर आज दिनांक 17 फेब्रुवारी 2021 सकाळी 10 वाजता एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. गौतम प्रकाशचंद्र वडनेरे, प्रबंधक श्री. पी. बी. मोरे, विभाग प्रमुख डॉ. एम.डी. रागीब, प्रा.सौ.क्रांती डी.पाटील, प्रा.सौ.मयुरी के.पाटील, श्री.धनंजय सावंत, श्री.आर.जे.पाटील, श्री.जे.बी.परदेशी, श्री.प्रमोद माळी यांचे सह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यशाळेत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,बचतगट सदस्य, शेतकरी बांधव यांनी भाग घेतला . ह्या माध्यमातून समाज हा केंद्रबिंदू मानून समाज उपयोगी उपक्रम महाविद्यालय राबविण्याचे कार्य करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More