मोदींच्या केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचे वतीने “विश्वासघात आंदोलन”

मोदींच्या केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचे वतीने “विश्वासघात आंदोलन”

चोपडा, जळगाव: गेल्या ७ वर्षातील पेट्रोल, डिझल, गॅस दरवाढ म्हणजे भाजप सरकारने केलेला मोठा विश्वासघात आहे. ह्या विश्वास घातकी सरकारचा आज राज्यात प्रदेशाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे व काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड . भैय्यासाहेब संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे यांच्या नेतृत्वात “विश्वासघात” आंदोलन करण्यात आले.


युवक काँग्रेस विश्वासघात आंदोलन करून निषेध व्यक्त करत आहे. यापुढे केंद्र सरकारने जर इंधन दरवाढ थांबवून भाव कमी केले नाही तर युवक काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन करेल.

सदर पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढी संदर्भातील आंदोलन हे लोहान पेट्रोलपम्प येथे करण्यात आले या आंदोलनात तालुका अध्यक्ष काँग्रेस राजाराम पाटील शहर अध्यक्ष के डी चौधरी सर कृ बा समिती माजी उप सभापती नंदकिशोर सागोरे सर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किरण सोनवणे युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सुमित पाटील राजेंद्र पाटील बी एम पाटील सर एन एस यु प्रदेश सचिव चेतन बाविस्कर सोहन सोनवणे दुर्गेश पवार दीपक पाटील तसेच नाना मोरे भगवान पाटील शेख हमीद कुरेशी काँग्रेस, युवक काँग्रेस , एन एस यु आय चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Read More