ए.एल्.चव्हाण सर
व कुटुंबाकडून मुलाच्या विवाह सोहळ्यात दीपस्तंभच्या मनोबल प्रकल्पासाठी
रु. ५१,००० चे योगदान….
चोपडा प्रतिनिधी —
चोपडा तालुक्यातील जय श्री दादाजी हायस्कूल तांदळवाडी येथील ज्येष्ठ शिक्षक व माजी मुख्याध्यापक अरूण लोटू चव्हाण (वर्डीकर ह.मु.शिवकॉलनी
,चोपडा) यांचे सुपूत्र अभियंता चि.पराग ( B.E.) व जळगांव निवासी खेडीभोकरीकर श्री.योगिराज दत्तात्रय पाटील यांची सुकन्या चि. सौ. कां. निकीता (B.E.) यांचा नुकताच एका विधायक अर्थानं हटके असा विवाह सोहळा संपन्न झाला.

या आनंदसोहळ्याआधी ए.एल्. चव्हाण सर, सुपूत्र चि.पराग, आई सौ. मंगलाताई बहिण सौ. राजेश्वरी ( B. E. ) चि.परागचे मावसे डॉ. प्रशांतचंद्र पाटील (दीपस्तंभ परिवार सदस्य ) असे सर्वांनी विचारविनिमय करुन समाज भान जपण्याच्या भूमिकेतून जळगांव दीपस्तंभाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या मनोबल प्रकल्पाला चि.परागच्या विवाहाच्या आनंदसोहळ्याप्रसंगी आप्तस्नेहिजनांकडून येणाऱ्या स्नेहभेट रक्कमेतून रू. ५१, ००० /चे योगदान देण्याचे ठरविले होते. त्यानुसार विवाह सोहळ्यात दीपस्तंभचे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांना ए.एल्. चव्हाण व सौ. मंगलाताई अरूण चव्हाण यांनी रु. ५१,००० /चा धनादेश देत एक हटके असा नवा सुंदर समाजापयोगी विचार विवाहाच्या आनंदसोहळ्यात उपस्थितांसमोर प्रत्यक्ष कृतीत आणला.. शक्यतो कुठल्याही विवाह सोहळ्यात बघायला, अनुभवायला न मिळालेला एक विधायक, प्रेरणादायी, अनुकरणीय आदर्श सर्वांसमोर ठेवला…

विवाहाच्या आनंदसोहळ्यात असा विधायक समाज भान जपणारा कृतीशील आदर्श सर्वांसमोर ठेवणारे ए.एल्. चव्हाण, त्यांचे अभियंता *सुपूत्र पराग या कुटुंबाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे .
कोरोना काळात फक्त पन्नास वऱ्हाडीच्या उपस्थितीत व वायफळ खर्चाला तिलांजली देत परागने नवीन आदर्श निर्माण केला आहे .
नुकताच विवाहबद्ध झालेला
चि.पराग आणि चि. सौ. कां. निकीता यांना वैवाहिक वाटचालीसाठी शुभ आशीर्वादासह अनंत शुभेच्छा ।।।












