शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षणास स्थगिती मिळावी व ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे मानधन त्वरीत मिळावे यासाठी विविध संघटनांमार्फत तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन
चोपडा प्रतिनिधी :— शाळाबाह्य , अनियमित व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विषेश शोधमोहीम राबविण्याबाबत कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला असून या शासन आदेशानुसार जिल्ह्यात सदर शोधमोहीम राबविन्या कामी नियोजन करण्यात आलेले असून दि 1 मार्च 10 मार्च 2021 या कालावधीत प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्याबाबत सूचित केले आहे व याकामी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकांच्या नियुक्त्या देखील करण्यात आलेल्या आहेत तरी सध्या राज्यात व जिल्ह्यात तसेच चोपडा शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती बंद करण्यात आलेली आहे , शासनाने या आजाराचा फैलाव व प्रादुर्भाव वाढू नये अथवा होऊ नये म्हणून अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून ,आपल्या जिल्ह्यात देखील त्या लागू करण्यात आलेल्या आहेत तसेच चोपडा शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड -19 चे बाधित रुग्णांचे प्रमाण चिंताजनक आहे .

चोपडा शहरात व ग्रामीण भागात दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे , अशा परिस्थितीत याविषयीचे शोध सर्वेक्षण मोहीम राबविण्यासाठी शिक्षकांना प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करायची असल्याने शिक्षकांमध्ये कोविड -19 ने बाधित होण्याबाबत भीती निर्माण झालेली आहे म्हणून निवेदनाद्वारे तालुक्याचे तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांना कोविड 19 चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत सदर शोधमोहीमेस स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तूर्तास स्थगिती करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे .

तसेच नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना अजूनही कोणत्याही प्रकारचे मानधन मिळालेले नाही , चोपडा तालुक्यात ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली यासाठी तालुक्यातील बहुतेक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली होती . सर्वांनी निवडणुकीचे काम निपक्षपातीपणे व प्रामाणिकपणे व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात प्रशासनास सहकार्य केलेले असून परंतु अद्याप पर्यंत सदर निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचे मानधन मिळाले नसून यासंदर्भात त्वरित देण्याबाबतची मागणी व निवेदन तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे करण्यात आलेले आहे .
सदर निवेदन देतेवेळी विविध संघटना व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते ,त्यात चोपडा तालुका मुख्याध्यापक संघ ,चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक संघ ,चोपडा तालुका शिक्षक लोकशाही आघाडी , चोपडा तालुका माध्यमिक शिक्षकेतर संघटना, चोपडा उच्च माध्यमिक शिक्षक संघटना, चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक भारती, चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक सेना, चोपडा माध्यमिक आश्रम शाळा शिक्षक संघटना ,चोपडा शिक्षकेतर कर्मचारी संघटना ,चोपडा तालुका माध्यमिक कलाध्यापक संघ ,चोपडा तालुका माध्यमिक क्रीडा शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना ,चोपडा तालुका व शहर काँग्रेस शिक्षक सेल ,तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल व इत्यादी संघटना व पदाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे…













